मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली राजकीय भूमिका थोडीसी बदलविली आहे. हिंदुत्वाच्या अजेंड्यावर मनसे यापुढे राजकारण करणार आहे. २३ रोजी मनसेने पक्षाचा नवीन ध्वजाचे अनावरण केले. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात एनआरसी कायद्याला समर्थन दिले आहे. एनआरसीच्या समर्थनार्थ ९ मार्चला मनसे मोर्चा काढणार आहे. त्यातच काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत असून मनसे-भाजप युतीबाबतची चर्चा सुरु झाली आहे.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यावरून मनसे-भाजप युतीची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आता आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे आणि आशिष शेलार हे चांगले मित्र म्हणून देखील परिचित आहेत.