मुंबईः ‘कोहिनूर स्क्वेअर’ मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली होती. आज गुरुवार २२ रोजी यावर राज ठाकरे यांची चौकशी होणार आहे. दरम्यान आज राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. चौकशी सुरु झाली असून संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत चौकशी चालू शकते.
या कारवाईविरोधात बंद तसेच इतर पद्धतीने विरोध करण्याचा इशारा मनसेने दिला होता. मात्र, राज ठाकरे यांनी शांतता बाळगण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे कोणत्याही आंदोलनाची घोषणा करण्यात आली नसली तरी छुप्या पद्धतीने तयारी करून ऐनवेळी विरोध प्रदर्शन केले जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत.