राज ठाकरे खूनप्रकरणी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक

0

नंदुरबार । नंदुरबार शहरालगत कोकणी हिल दुधाळे परिसरातील नववीत शिकणारा निष्पाप विद्यार्थी राज ठाकरे याचा निर्घुण खूनप्रकरणी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी दि.16 जुलै रविवार रोजी सकाळी 11 वाजता देवमोगरा मंदिर, नवापूर चौफुली, नंदुरबार येथे अखिल भारतीय आदिवासी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भरत वळवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी उपस्थित राहण्याचे अखिल भारतीय आदिवासी महासंघ व संलग्नित सर्व आदिवासी संघटनांतर्फे करण्यात येत आहे. नववीत शिकणारा निष्पाप विद्यार्थी राज ठाकरे याचा निर्घुन खून झाल्याच्या घटनेने संपुर्ण नंदुरबार शहर व परिसर सुन्न झाला आहे. समाजा-समाजामध्ये चिंता होत असून भितीचे वातावरण निर्माण झालेले असून जनमाणसात संतप्त भावना व्यक्त होत आहे. आरोपींना पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने तत्काळ तपासाचे चक्रे फिरवून आरोपींना अटक करुन चांगली कामगिरी बजावली
आहे.

दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन
पोलीस प्रशासनाच्या प्राथमिक तपासात केवळ पैशासाठी राज ठाकरे या विद्यार्थ्याचा खून केल्याचे समोर आले आहे. आरोपीवर कट, कारस्थान रचून अपहरण करुन निर्घुण खून करणे, दरोडा टाकून चोरी करणे इत्यादी गुन्ह्याची पोलीसात नोंद असतांना आरोपींना लागलीच बाल न्यायालयात जामीन देखील मिळाला. याबाबी न्यायालयीन व कायद्याच्या अखत्यारीत आहेत. आरोपींना कायद्याने काय व्हायचे ते होईल. शिक्षाही होईल, मात्र राज ठाकरे हा आई-वडीलांचा एकुलता एक मुलाचा जीव गेल्याने राज ठाकरे यांचा निर्घुन खून करणार्‍या गुन्हेगार विरोधात समाजासमाजातील जनमानसामध्ये तीव्र संतप्त भावना व्यक्त होत आहेत. गुन्हेगारांची सखोल चौकशी करुन कठोर शिक्षा झाली पाहीजे, यासाठी विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी बैठकीचे उपस्थित राहण्याचे विनंतीवजा आवाहन अखिल भारतीय आदिवासी महासंघ व संलग्नित संघटनांतर्फे करण्यात आले आहे.