मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेणार आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित यांचा विवाह २७ जानेवारीला संपन्न होणार आहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे दिल्लीत राहुल यांची भेट घेणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्या माध्यमातून ही भेट होऊ शकते. या भेटीच्या समन्वयाची जबाबदारी देवरा यांच्याकडे आहे. राहुल आणि राज यांच्याकडून सतत पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले जाते. त्यामुळे या भेटीकडे विशेष बघितले जात आहे.