राज ठाकरे यांच्या शेजारी बसणारे शिशिर शिंदे, शिवसेनेत मागच्या रांगेत

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत मुंबईत शिवसेना भवनात मेगा पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेनेचे आमदार-खासदार उपस्थितीत होते. यावी राऊत यांनी गौप्यस्फोट केले व शक्तिप्रदर्शनही केले. या पत्रकार परिषदेदरम्यानचा एक फोटो पोस्ट करत मनसे नेते अमेय खोपकर यांनी मनसे सोडून शिवसेनेत गेलेल्या शिशिर शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

अमेय खोपकर म्हणाले, मनसे सोडून गेल्यावर दुसऱ्या पक्षात नेत्यांची पण काय गत होते ते या छायाचित्रावरुन दिसते. राज ठाकरेंच्या पंगतीत बसणारे शिशिर शिंदे, आजच्या टुकार पत्रकार परिषदेत नगरसेवकाच्या मागे उभे होते, किती दुर्देव! असे म्हणत त्यांनी शिशिर शिंदेंवर खोचक टीका केली आहे.