राज ठाकरे यांनी स्टॅन ली यांना व्यंगचित्रातून वाहिली श्रद्धांजली

0

मुंबई: स्पायडर मॅन, हल्क यांच्यासारख्या सुपरहिरोंची निर्मिती करणाऱ्या मार्व्हल कॉमिक्सचे जनक स्टॅन ली यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून आदरांजली वाहिली आहे. आठवड्याभरापूर्वी 13 नोव्हेंबरला वयाच्या 95 व्या वर्षी ली यांचे निधन झाले. स्टॅन ली जगाचा निरोप घेत असतानाच व्यंगचित्र राज यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केले आहे.

अनेक दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. त्यांना राज यांनी व्यंगचित्रातून आदरांजली वाहिली. राज यांनी व्यंगचित्रातून ली जगाला अलविदा म्हणताना दाखवले आहेत. यामध्ये ली यांनी निर्माण केलेले सुपरहिरो पृथ्वीवर दिसत आहेत. ‘माझ्या सुपरहीरोंनो, येतो मी. माझ्या पृथ्वीला सांभाळा,’ असे म्हणत ली जगाचा निरोप घेताना दिसत आहेत.