राज बहुउद्देशीय संस्थेतर्फे बालनाट्य महोत्सव

0

जळगाव । राज बहुउद्देशीय संस्थेतर्फे वर्धापनदिनाचे औचित्य साधून गेल्या वर्षभरात विविध बालनाट्य स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त झालेल्या चार बालनाट्यांचे प्रयोगांचा महोत्सव आज 26 रोजी गंधे सभागृहात दुपारी 4 वाजेपासून आयोजित करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात पारितोषिक मिळालेल्या बालनाट्यातील बाल कलावंतांना प्रोत्साहन मिळावेव त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालय मेहरुणचे ‘मुलं देवाघरची फुलं‘, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगावचे ‘छत्री’, खुबचंद सागरमल विद्यालय, शिवाजीनगरचे ‘वासुदेव आला रे’.

उपस्थितीचे केले आवाहन
या वर्षीच्या बालनाट्य स्पर्धेत प्राथमिक फेरीत प्रथम पारितोषिक तर अंतिम फेरीत तृतीय पारितोषिक प्राप्त केलेल्या दीपनगर येथील श्री शारदा माध्यमिक विद्यालयाचे ‘मिनू कुठे गेला’ या चार बालनाट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या बालनाट्य महोत्सवाचे प्रायोजकत्व दि हस्ती को-ऑप. लि.बँक दोंडाईचा यांनी स्वीकारले असून, ला.ना. सार्वजनिक विद्यालयाच्या गंधे सभागृहात आज 26रोजी होणार्‍या या महोत्सवास बाल प्रेक्षकांसह पालकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. यावेळी विविध बालनाट्य प्रयोग यावेळी सादर करण्यात येणार आहे.