मुंबई । आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित शालिनीताई भालेकर स्मृतीचषक जलद बुध्दिबळ स्पर्धेत राज जयवर्धन, सुजल कांबळे, ध्रुव हळदणकर, कृष्णा सोनी व तन्वी अधिकारी विजयी ठरले. मुंबई शहर बुध्दिबळ संघटना मान्यतेने झालेल्या बुध्दिबळ स्पर्धेत मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक आदी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह 290 खेळाडू सहभागी झाले होते. अंतिम विजेत्यांनी अपराजित राहून प्रथम क्रमांक मिळविला. बक्षीस समारंभ माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, क्रीडाप्रेमी अनंत भालेकर व संयोजक लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. विविध पाच वयोगट बुध्दिबळ स्पर्धेत एकूण 105 पुरस्कार प्रदान करण्यात आले.
स्पर्धेतील विजेते – 6 वर्षाखालील गट : राज जयवर्धन, हर्ष परब, कार्तिक वेदांत, विराज राणे, अनुज ठाकूर, निशा व्हाटवर; 8 वर्षाखालील गटात सुजल कांबळे, दक्ष जागेसिया, संनिधी भट, रीधान भंडारी, यशस पाटील, समर्थ पाटकर. 10 वर्षाखालील गट : ध्रुव हळदणकर, प्रथमेश गावडे, आर्या बहाळकर, अमेय शेट्टी, श्लोक झवेरी, अरविंद अयर.