‘राझी’नंतर या चित्रपटात झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री

0

पुणे-‘राझी’चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळविले आहे. बॉक्स ऑफिसवर २०७ कोटींची भरघोस कमाई या चित्रपटाने केली आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर या मराठमोळ्या अभिनेत्रीने काम केले आहे. या चित्रपटानंतर आता अमृता खाविलकर जॉन अब्राहीम मुख्य भूमिकेत असलेल्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात झळकणार आहे. तिचा दुसरा हिंदी चित्रपट जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी या दोघांसोबत आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात अमृता खानविलकर सरिता नावाचे पात्र म्हणजेच मनोज वाजपेयीच्या बायकोची भूमिका साकारणार आहे. राझीच्या अचाट यशानंतर लागलीच दुसरा हिंदी चित्रपट मिळाल्याने हिंदी फिल्म इंडस्ट्रीने केलेलं हे वॉर्म वेलकम अमृताच्या चांगलंच पथ्यावर पडत आहे. कारण सत्यमेव जयतेच्या ट्रेलर लाँचच्या प्रसंगी लीड कास्टच्या मांदियाळीत अमृता स्टेजवर उभी होती. चित्रपटाच्या दरम्यान ती दिग्दर्शकाची फेवरीट होती. दिग्दर्शक मिलाप झवेरी तिला ‘सेटवरची सनशाईन’ असे म्हणत असतं. शिवाय मनोज वाजपेयींशी तिची खास बॉण्डिंग होती, कारण अमृताचा पती हिमांशू मल्होत्रा सहनिर्मिती करत असणाऱ्या चित्रपटात मनोज वाजपेयी काम करत आहेत.

हिंदी नंतर आता मराठीत काम करताना अमृताच्या मराठी बाबतच्या इच्छा दुणावल्या आहेत. मराठीत स्वतःच्या नावावर एक पूर्ण चित्रपट असावा आणि तो हिट करावा अशी तिची इच्छा तिने ईनाडू मराठीच्या या मुलाखतीत बोलून दाखवली.