इसरार यांना पाच हजाराचा दंड
निगडी : तळवडे, ज्योतीबानगर येथे सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणार्या मे. इसरार महमद यांच्यावर दंडात्मक कारवाई करत पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ‘फ’ विभागातील अधिकार्यांनी मंगळवारी ही कारवाई केली. शहरात विविध कंपन्यांकडून सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकला जातो. राडारोड्या टाकणार्यांवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. ‘फ’ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत सहायक आरोग्याधिकारी डी. जे. शिर्के, आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे यांनी मंगळवारी प्रभाग क्रमांक 12 ज्योतीबानगर, तळवडे या ठिकाणी मे.इसरार महमद हे सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकताना सापडले. त्यांच्यावर कारवाई करत पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे .