राडारोडा टाकणार्‍या शिपायाविरोधात गुन्हा

0

पुणे । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात बेकायदेशीरपणे सात ट्रकना परस्पर परवानगी देऊन राडारोडा टाकणार्‍या शिपायाविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला असून विद्यापीठ प्रशासनाने त्या शिपायाला निलंबित केले असल्याची माहिती कुलसचिव अरविंद शाळीग्राम यांनी दिली.विद्यापीठात घडलेल्या घटनेबद्दल ट्रक जप्त करून पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर विद्यापीठातील कर्मचार्‍याचे नाव पुढे आले. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली व त्यांना सेवेतून निलंबितही केले आहे.

अरविंद शाळीग्राम, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ13 डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सर्व गेटवर सुरक्षारक्षक असतानाही थोड्या ना थिडक्या सात ट्रक विद्यापीठाच्या आवारात घुसल्या व राडारोडा टाकू लागल्या. मुख्य म्हणजे काही प्रमाणात राडारोडा टाकून झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या ही बाब लक्षात आली. याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर आता तपास करून पोलिसांनी विद्यापीठातील कर्मचारी प्रकाश मगाडे (शिपाई) यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला असून त्यांच्या विरोधात 426, 431, 447, 109 या कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. त्याचबरोबर मागाडे यांना सेवेतूनही निलंबित करण्यात आले आहे.याबाबत कुलसचिव अरविंद शाळीग्राम म्हणाले, या प्रकरणानंतर विद्यापीठातील सुरक्षेचाही आढावा घेतला आहे. तसेच, या प्रकरणात मॉर्डन कॉलनीमधील कोणीतरी जाधव या व्यक्तीचा हा राडारोडा असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. जप्त करण्यात आलेल्या सात ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.