शहादा/असलोद: शहादा तालुक्यातील राणीपूर भागात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आ. राजेश पाडवी यांनी केली.नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात आले. शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई अदा करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.
सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या राणीपूर व परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने अनेक गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी गारपीटही झाली असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्त गावातील
राणीपूर, नागझिरी, नंबरपाडा, साबलापाणी, आदा-या पाडा येथे झालेल्या वादळी पाऊसाने झालेल्या नुकसानीची पाहणी आ.राजेश पाडवी यांनी करून पंचनामे करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत.
यावेळी, प्रात अधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, विरसिंग पाडवी, विठ्ठलराव बागले, सुखलाल रावताळे, सचिन पावरा, कमल पावरा, हितेश मेडेकर, रामदास पावरा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.