भुसावळ- चित्रपट निर्माता संजयलिला भंसाली यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटामुळे राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या असून या चित्रपटाच्या निषेधार्थ राजपूत समाजातर्फे बुधवार, 22 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास नाहाटा चौफुलीवर निदर्शने करण्यात आली.
भंसाली यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटात चुकीचा इतिहास दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे त्यावर बंदी आणण्याची मागणी समाजातर्फे करण्यात आली आहे. अन्यथा तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.