राणी पद्मावती चित्रपटाविरोधात एरंडोल शहरात मोर्चा

0

एरंडोल । येथील महाराणा प्रताप युवासेना, राजपूत समाजाच्या वतीने राणी पद्मावती हा चित्रपट प्रदर्शीत करू नये या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त मोर्चेकर्‍यांनी संजय भंसाली यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध केला. तहसीलदार सुनीता जर्‍हाड, पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी झाले होते. सकाळी 11 वाजता धरणगाव चौफुली पासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी निर्माता संजय भन्साळी यांच्या निषेधार्थ घोषणा देवून त्याच्या प्रतिमेस चपलांची माळ घातली.

मोर्चात यांनी घेतला सहभाग
मोर्चात जि.प.सदस्य नाना महाजन, माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले, नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, उपनगराध्यक्ष जाहिरोद्दिन शेख कासम, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, महाराण प्रताप युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमरसिंग राजपूत, तालुकाध्यक्ष पिंटू राजपूत, उपाध्यक्ष प्रविण पाटील, सुनील पाटील, संघटक सुधीर पाटील, राकेश पाटील, जगदीश पाटील, रवींद्र जाधव, राजेंद्र पाटील, विजय पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, भाजपाचे तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील, नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, माजी नगरसेवक जगदीश ठाकूर, जगदीश ठाकूर, सुनिल भैय्या, प्रसाद दंडवते, राकेश पाटील, बाळासाहेब पाटील, रूपसिंग सूर्यवंशी, राजेश पाटील यांचेसह सर्वपअक्षीय पदाधिकारी, समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.