राणी पद्मावती येतेय या नवरात्रीमध्ये!

0

संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटाचा फर्स्ट लूक या नवरात्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि भन्साली प्रॉडक्शन्सच्या पद्मावती सिनेमाचे पहिले पोस्टर २१ सप्टेंबरला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रिलिज होत असल्याचे कळतेय. नवरात्रीच्या घटस्थापनेची संपूर्ण देशभर सध्या तयारी सुरू आहे आणि घटस्थापनेच्या दिवशीचे भन्सालींच्या राणी पद्मावतीचे रूप सर्वांसमोर येत आहे. पद्मावती फिल्म भारतीय संस्कृती आणि भारतीयांच्या कर्तृत्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे नवरात्रीला देवीच्या स्थापनेच्या शुभप्रसंगी या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलिज होणार आहे. पद्मावती चित्रपटात आजपर्यंत कधीही न अनुभवलेली दृश्यात्मक अभिव्यक्ती पाहायला मिळणार आहे. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि भव्य सिनेमॅटिक अनुभव हे पद्मावतीचे वैशिष्ट्य असेल. संजय लीला भन्साली याविषयी म्हणाले की, राणी पद्मावतीची कथा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी उत्सुक आहे. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आमच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक आम्ही घेऊन येतोय. या माध्यमातून आम्ही नवरात्रोत्सव साजरा करणार आहोत.