राणेंच्या भाजपप्रवेशावर केसरकरांचा आक्षेप

0

नाशिक । काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात लवकरच न्यायालयासमोर यादी सादर होणार आहे, त्यामुळे त्यांना भाजपात घ्यायचे किंवा नाही याचा निर्णय राज्यातील भाजपा नेत्यांनी घ्यावा, असे मत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलें आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराबाबत झिरो टोलरन्स घोषित केलें आहे. अशावेळी ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातील यादी न्यायालयात सादर होणार आहे. त्यामुळे भाजपाने विचार केला पाहिजे, असेही दीपक केसरकर पुढे म्हणाले.नाशिक येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने आयोजित जीएसटी व्यापारी परिषदेनंतर वार्ताहरांशी बोलतांना जीएसटीच्या अंमलबजावणीत व्यापार्‍यांच्या सोयीचे बदल केले जातील. पण त्यासाठी संयम ठेवा, असेही केसरकर म्हणाले. एका कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्र्यांचा निर्णय राज्यात होऊ शकत नाही, तो दिल्लीतच होणार आहे. नारायण राणेंचे भाजपा प्रवेशाची कोणतीही डेडलाईन नसल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते.