राणेंनी आयुक्तांवर फेकले मासे

0

सिंधुदुर्ग । मच्छिमारांच्या प्रलंबित प्रश्‍नांवर जाब विचारण्याकरता गेलेले काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी तेथील सहाय्यक मासे आयुक्त यांच्यावरच थेट मासे फेकल्याने गदारोळ माजला. आमदार नितेश राणे यांनी मच्छिमारांच्या प्रश्‍नांबाबत जाब विचारण्यासाठी सहाय्यक मत्स्य आयुक्त जिल्हा कार्यालय मालवण इथे भेट दिली. यावेळी राणे यांच्यासोबत आलेल्या मच्छिमारांनी थेट आयुक्तांच्या टेबलवर माशांची टोपली ओतली.

नीतेश यांनी अधिकार्‍याला झापले
आयुक्तांसोबत चर्चा सुरु असताना, त्यांनी योग्य उत्तरे न दिल्याने चिडलेल्या नितेश राणे यांनी थेट त्यांच्या अंगावर मासे फेकले. तुम्ही तुमची कामे नीट करत नाहीत, जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, पैसे खाता, त्यामुळेच आम्हाला इथे यावे लागते, असे म्हणत नितेश राणे यांनी अधिकार्‍यांना झापले.