मुंबई:तळकोकणात होणाऱ्या या कार्यक्रमाबाबत जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे दोन नेते नेते सुमारे दीड वर्षांपूर्वी सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही समीकरण जुळवून आणले होते. मात्र त्यानंतर नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेण्याबाबत शिवसेनेने घेतलेला जोरदार आक्षेप पाहता हे दोन नेते पुन्हा एकत्र व्यासपीठावर येणार का, याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सुरेश प्रभू यांनीही सोयीस्करपणे शिवसेनेला गाफील ठेवत भाजपचा आसरा घेतल्याने त्यांचेही शिवसेनेसोबत फारसे सख्य नाही.त्यात शिवसेना व भाजप आगामी निवडणुकांना युती म्हणून सामोरे जाणार की नाही हे देखील अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे चिपीवर या सर्व नेत्यांचे सेफ लॅण्डिंग होत असले तरी राज्यात युतीच्या विमानाचे लॅण्डिंग होणार का याविषयी उत्सुकता आहे.