कणकवली: विधानसभा निवडणुकीची राज्यात रणधुमाळी सुरु आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन अनेक नेते भाजप-शिवसेनेत गेले. दरम्यान कोकणातील मातब्बर नेते माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी आज अखेर स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करून भाजपात प्रवेश केला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्या प्रचारार्थ कणकवली येथे सभा सुरु आहे. यावेळी नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाची भूमिका स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून मी भाजपात कधी प्रवेश करणार असा प्रश्न विचारला जात होता, आज अखेर मी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षासह भाजपात प्रवेश करत असल्याची घोषणा नारायण राणे यांनी केली.
कोकणच्या विकासासाठी मी भाजपात गेलो असल्याचे स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिले. मुख्कोयमंत्करी देवेंद्णार फडणवीस यांच्चाया कामामुळे मी प्रभावित झालो असून कोकणाचा विकास भरून काढण्यासाठी मी भाजपात प्रवेश केला आहे असे नारायण राणे यांनी सांगितले.