राणे यांच्या फार्महाऊसवर हतोडा

0

मुंबई-राणे यांच्या फार्महाऊसवर हतोडाखासदार नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी यांच्या नावावर कर्नाळा परिसरात असलेल्या तारा फार्महाऊसची जवळपास अडीच हजार चौरस मिटर जागा महामार्ग रुंदीकरणासाठी संपादित करण्यात आली. यात प्रामुख्याने, जमिन, फळझाडे, वनझाडे, जमिनीभोवतालची संरक्षण भिंत, आणि काही बांधकामांचा समावेश होता. यासाठी नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी निलम राणे यांना चार टप्प्यात एकुण १ कोटी ५२ लाख ३७ हजार ५१५ एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे.

२०१७ च्या जानेवारी महिन्यात आणि २०१८ च्या मार्च महिन्यात राणे यांना भुसंपादनाची देय रक्कम अदा करण्यात आली होती. भुसंपादनाची रक्कम अदा केल्यानंतर सदर जागेचा ताबा घेऊन ती महामार्ग प्राधिकरणाकडे रुंदीकरणासाठी हस्तांतरीत करणे अपेक्षित होते. मात्र रायगडच्या भूसंपादन विभागाने याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र आज सकाळी भूसंपादन अधिकाऱ्यांनी राणे यांच्या फार्महाऊसवर कारवाई केली. भूसंपादन विभागाच्या पथकाने जेसीबीच्या मदतीने फार्महाऊसची संरक्षक भिंत तोडली. पथकाने सोमवारी २१ गुंठे जमीन संपादित केली आहे.