‘राणे राजकीय विनोद करतात, हे मला माहित नव्हते: पवारांचा चिमटा

0

बारामती: माजी मुख्यमंत्री भाजप खासदार नारायण राणे यांनी काल महाविकास आघाडीचे सरकार लवकरच जाईल. महाविकास आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही असे विधान नारायण राणे यांनी केले होते. दरम्यान यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत, ते असे विनोद करतात हे मला माहित नव्हते. ते विनोदी आहेत मात्र असा राजकीय विनोद ते करतील असे मला माहित नव्हते’ असा चिमटा शरद पवार यांनी काढला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून नारायण राणे यांनी सातत्याने सरकारवर टीका केली आहे. वर्षभरही सरकार टिकणार नाही असे विधान राणे यांनी केले होते.