राणे विरुद्ध कॉंग्रेसचा वाद पुन्हा चव्हाट्यावर

0

मुंबई : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकीसाठी विधिमंडळात मतदान करण्यासाठी अनेक कॉंग्रेस आमदार व नेते आज उपस्थित होते. मात्र काही आमदारांच्या आणि नेत्यांच्या वक्तव्यामध्ये असलेला विरोधाभास दिसून येत होता. एकीकडे कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मनीष तिवारी यांनी इंदू सरकारला होत असलेल्या विरोधाला पाठिंबा दर्शवला आहे तर दुसरीकडे नितेश राणेनी मधूर भांडारकर यांच्या विरोधात काही काँग्रेस नेत्यांनी केलेल्या आंदोलनाबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रेसमधील विशेषतः राणे विरुद्ध कॉंग्रेस असा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

भुजबळ मतदान करून आल्यानंतर कॉंग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी, राष्ट्रवादी आमदार अनंत गाडगीळ, जितेंद्र आव्हाड मतदान करून बाहेर पडले. यावेळी इंदू सरकारबद्दल कॉंग्रेसची नेमकी भूमिका काय असा सवाल त्याना केला असता, इंदिरा गांधी हे देशातील एक मोठे व्यक्तीमत्त्व असून त्यांच्या कारकिर्दीवरील चित्रपटात जर काही आक्षेपाहारी असेल तर ते वगळणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

मात्र मधुर भांडारकर यांचे कार्यक्रम होऊ देत नाहीत आणि कॉंग्रेसचा इंदू सरकारला विरोध आहे यावर आपल्याला काय वाटते असे विचारले असता ते म्हणाले, ”तोडफोड करणे आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे ही काँगेसची संस्कृती नाही. राणे कुटुंबीयांनी कोणतीही कृती केली की त्यावर काँग्रेसमधूनच आता पर्यंत टीका केली गेली आहे. भांडारकर यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्याना काँग्रेसच्या नेत्याना समज दयावी अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली.

‘इंदू सरकार’ हा चित्रपट १९७५ ते १९७७ या काळातील देशातील आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला आहे. यातील प्रमुख पात्रे ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांच्यावर बेतलेले आहे.

काँग्रेस जर प्रत्येक प्रश्न शांतीच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करत असेल तर “इंदू सरकार ” या चित्रपटाला विरोध करणेही योग्य नाही. तो चित्रपट आधी प्रदर्शित होऊ द्यावा नंतर पक्षाने भूमिका मांडावी.
नितेश राणे, आमदार, कॉंग्रेस