रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याने मालकावर खटला

0

चाळीसगाव। येथील हिरापूर रोडवरील हॉटेल रात्री एक वाजेपर्यंत सुरु असल्याने चाळीसगाव शहर पोलीसांनी मंगळवार 22 ऑगस्ट 2017 रोजी हॉटेल मालकाविरोधात न्यायालयात खटला पाठवला आहे.

22 ऑगस्ट 2017 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक युवराज रबडे, पोलीस नाईक संभाजी पाटील, संदीप तहसिलदार हे हिरापुर रोडवर गस्त घालत असतांना हिरापुर रोडवर असलेले हॉटेल जत्रा हे रात्री 1 वाजता ठरवलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ सुरु असल्याचे मिळुन आल्याने मुंबई पोलीस अधिनियम 33 (1) 135 प्रमाणे हॉटेल मालक चुडामण सोनवणे यांचे विरोधात न्यायालयात खटला पाठवण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल, ढाबे चालु ठेवल्यास त्यांचेवर कारवाई करुन परवाने रद्दचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.