जळगाव। शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांच्या पथकाला बुधवारी मध्यरात्री संशयितरित्या फिरत असतांना तीन जण मिळून आले असून त्यांच्याविरूध्द शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या पथकाला बुधवारी मध्यरात्री 3.47 वाजेच्या सुमारास धीरज अण्णा वाणी रा. शाहुनगर हा राजकमल टॉकीजवळ कोयता घेवून फिरतांना मिळून आला तर समाधान कैलास कोळी रा. कोळीपेळ हा देखील गस्ती दरम्यान पोलिसांना मध्यरात्री 4.03 वाजता मेस्को माता मंदिराजवळ लोखंडी सळई घेवून संशयितरित्या फिरतांना पथकाला मिळून आला. यासोबतच रात्री 4.03 वाजेच्या सुमारास राहूल रामदास कोळी रा. मेस्कोमातानगर हा देखील बालाजीमंदिर परिसरात लोखंडी छिन्नी धेवून फिरतांना मिळून आला आहे. या तिघांविरूध्द शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.