अहमदनगर: विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी मिळविली. त्यानंतर आता स्वत: राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. लवकरच विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले आहे.
भाजप नगरमध्ये जाहीरसभा घेणार आहे. यावेळी ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत कॉंग्रेसचे काही आमदारही भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसभेची निवडणूक सुरु असतानाचा विधानसभेचे विरोधी पक्षनेतेच भाजपात प्रवेश करणार असल्याने कॉंग्रेससाठी ही बातमी अगदी धक्कादायक आहे.