मुंबई : टेलिव्हिजनची लाडकी बहू राधिका मदन विशाल भारद्वाजच्या ‘पटाखा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. आणि ‘मर्द को दर्द नही होता’या चित्रपटातही ती झळकणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (टीआयएफएफ)हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. यासाठी राधिका खूपच उत्साहित आहे.
‘मर्द को दर्द नही होता’ला टीआयएफएफ २०१८ मध्ये वर्ल्ड प्रिमीयरसाठी निवडण्यात आले आहे. यावर राधिका प्रतिक्रिया देत म्हणाली, एक नवोदित अभिनेत्री म्हणून टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी मी खूपच उत्साहित आहे. चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मिळण्याचा अनुभव खूपच छान असणार आहे. माझ्या करिअरचा हा काळ खूपच छान आहे. सलग माझे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे एका स्वप्नासारखेच आहे, असे ती म्हणाली.