राफेलच्या आड येणाऱ्यांना हटविले जाते-राहुल गांधी

0

नवी दिल्ली- सीबीआय संचालक अलोक वर्मा यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. यावरून राजकारण तापले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या प्रकरणावरून मोदींना लक्ष करत टीका केली आहे. आलोक वर्मा हे राफेल घोटाळ्याची चौकशी करत होते तसेच ते राफेल घोटाळ्याची कागदपत्रही वर्मा जमा करत होते त्यामुळे त्यांना हटविण्यात आले असून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असल्याचे आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.

या सरकारचा राफेल हा सर्वात मोठा घोटाळा असून राफेलच्या आड जे जे येणार त्यांना हटविले जाईल असे आरोप राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून केले आहे.