नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरून कॉंग्रेसने पुन्हा एकदा सरकारवर हल्ला केला आहे. आज कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सरकारी तिजोरी लुटण्याचे आरोप केले आहे. मोदींमुळे संरक्षण व्यवस्था धोक्यात आली आहे असे आरोप देखील कॉंग्रेसने केले आहे.
विरोधी पक्षाने राफेलच्या चौकशीची मागणी लावून धरण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला यांना मैदानात उतरविले आहे. पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी राफेलबाबत जेपीसीसमोर येऊन सर्व खुलासे करावे, खरेदी प्रक्रीयेबाबत माहिती द्यावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. राफेलबाबत फक्त जेपीसीच चौकशी करू शकते. मोदी राफेलवरून पळ काढत असून खोटे बोलत आहे असे आरोप कॉंग्रेसने केले आहे.