नवी दिल्ली-राफेल करारासाठी रिलायन्सची निवड करण्यात आल्यामुळे कॉंग्रेसने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांना फायदा व्हावा यासाठी हा करार अंबानीला दिला आहे असे आरोप केले आहे. ३० हजार कोटींचा हा घोटाळा असून पंतप्रधान मोदी याबाबत काहीही बोलायला तयार नाही. मोदींना प्रश्न विचारण्यासाठी मी एक दिवसाचा पत्रकार होण्यास तयार आहे असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यात त्यांनी राफेल प्रश्नावरून पंतप्रधान मोदी गप्प असतात तुम्ही त्यांना प्रश्न विचारा असे पत्रकारांना सांगितले, किंवा मोदींना प्रेस घेण्यास सांगा मी पत्रकार म्हणून त्यांना प्रश्न विचारतो असे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राफेलवरून तीनच प्रश्न विचारल्यास मोदी व्यासपीठ सोडून जातील असेही राहुल गांधी यांनी सांगितले.