राफेलवरून लोकसभेत गदारोळ: राहुल गांधींनी माफी मागावी यासाठी घोषणाबाजी

0

नवी दिल्ली- संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज कामकाजाचा पाचवा दिवस आहे. आज लोकसभेत राफेलच्या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वोच्च न्यायालयाने राफेल करारात कोणत्याही प्रकारचे अपहार झालेले नसल्याचे सांगत सरकारला क्लीन चीट दिली आहे. याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सरकारवर वारंवार आरोप केले आहे. आता सर्व आरोप निराधार होते हे निष्पन्न झालेले असल्याचे राहुल गांधी यांनी माफी मागावी या मागणीसाठी सत्ताधाऱ्यांनी गदारोळ केला.

सत्ताधारी पक्षाकडून राफेलवर चर्चा करण्याची मागणी होत आहे.