मोदी सरकारला दिलासा: राफेलविरोधातील सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्या !

0

नवी दिल्ली: मोदी सरकारवर एकमेव भ्रष्ट्राचाराचा आरोप राफेलमुळे झाला. विरोधकांनी राफेलवरून केंद्र सरकारला लक्ष केले. हे प्रकरण कोर्टात गेले आहे. राफेलविरोधात पुनर्विचार याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे. या निकालात राफेलविरोधात सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्या असून चौकशीची गरज नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाने केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच पंतप्रधानांबद्दल राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्यही निंदणीय आहे, यावरुन राहुल गांधींनी मागितलेली माफीही कोर्टाने मान्य केली आहे.

राफेल प्रकरणावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदीवर ‘चौकीदार चोर है’ असा प्रचार केला होता. त्याविरोधात भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधींविरोधात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर राहुल गांधींनी भाष्य केले होते.

३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा व्यवहार रद्द व्हावा या मागणीसाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने याआधीच फेटाळून लावली होती. या निर्णयाचा फेरविचार व्हावा या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. याप्रकरणीचा निकाल मे महिन्यात राखून ठेवण्यात आला होता. राफेल खरेदी व्यवहारामध्ये मोदी सरकारने मोठा घोटाळा केला आहे, असा जाहीर आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात केला होता.