नागपूर : देशात अराजकता निर्माण झाली असून पंतप्रधान मोदी सरकारचा राफेल कराराच्या चौकशीवरून सीबीआयच्या संचालकांवर राग होता. त्याच रागातून आकसाने केंद्राने सीबीआयला संपविल्याचा आरोप भाजपचे माजी केंद्रीय वित्त मंत्री यशवंत सिन्हा यांनी आज केला.
देशात कायद्याचे राज्यच राहिलेले नाही. सीबीआय प्रमुखांना कॅबिनेट किंवा पंतप्रधान हटवू शकत नाही असेही सिन्हा यांनी सांगितले. यावेळी भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हादेखिल उपस्थित होते. नागपूरमधील पत्रकार भवनामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले आणि कॉंग्रेसमध्ये गेलेले आशिष देशमुखही उपस्थित होते.