राफेल करारावरील याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी

0

नवी दिल्ली-राफेल कराराला मान्यता दिल्यापासून भाजप सरकारवर सर्वत्र टीका होत आहे. मोदी सरकारने अंबानींच्या कंपनीला फायदा व्हावा यासाठी या करार केल्याचे आरोप होत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय राजकारणात राफेल करारावरून मोठा वाद होत आहे. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने हा सर्वांत मोठा घोटाळा असल्याचे सांगत मोदी सरकारला चांगलेच घेरले आहे. आता हे प्रकरण देशातील सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ वकील मनोहरलाल शर्मा यांनी याप्रकरणी याचिका दाखल करून राफेल खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा झाला आहे. त्यामुळे हा करार रद्द केला जावा अशी मागणी याचिकेत केली आहे. यावर पुढील आठवड्यात सुनावणी होऊ शकते.

राफेल व्यवहारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. लोकसभेतील आपल्या भाषणा दरम्यानही त्यांनी मोदी आणि सीतारामन हे देशाबरोबर खोटे बोलत असल्याचा आरोप केला होता.