राफेल करार: अंबानीच्या कंपनीला ८०० कोटींचे काम-अरुण जेटली

0

नवी दिल्ली-राफेल करारामध्ये अनिल अंबानी यांच्या कंपनीला जास्तीत जास्त ८०० कोटीचे काम मिळणार आहे अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेमध्ये दिली. ऑफसेट भागीदाराची निवड डासूने केली. ऑफसेटच्या अटी विरोधी पक्षांना समजणार नाहीत. काँग्रेसने ऑफसेट कराराला कलाटणी दिली असा आरोप जेटली यांनी केला. राफेलवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना लोकसभेत उत्तर देताना ते बोलत होते.

काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या तुलनेत आम्ही करार केला त्यावेळी राफेल विमानाची मूळ किंमत ९ टक्क्यांनी तर शस्त्रसज्ज विमानाची किंमत २० टक्क्यांनी कमी झाली.

अनिल अंबानीच्या कंपनीला सरकारने मदत केली नाही. ऑफसेट भागीदाराची निवड राफेल विमानांची निर्मिती करणारी कंपनी डासूने केली. हवाई दलाला तात्काळ विमानांची गरज असताना संपुआच्या काळातील करारानुसार ११ वर्षांनंतर ही विमाने मिळणार होती असे जेटली यांनी सांगितले.