राफेल करार: कॉंग्रेसचे पितळ उघडे-देवेंद्र फडणवीस

0

मुंबईः सर्वोच्च न्यायालयाने राफेल करारात कोणताही घोटाळा झाला नसल्याचा निर्णय दिला आहे. राफेल कराराची सीबीआय चौकशींची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे पितळ उघडे पाडले आहे अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

देशाचा अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधींनी आता माफी मागावी, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.