राफेलवरून कॉंग्रेस तोंडावर पडली-भाजप

0

नवी दिल्ली-राफेल करारात कोणताही घोटाळा झालेला नसल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली. त्यामुळे राफेल घोटाळा झालेला नसल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला मोठा दिलासा दिला आहे. राफेल घोटाळ्यावरून कॉंग्रेस मोदी सरकारवर सातत्याने टीका करत होती. मात्र आज कोर्टाने निर्णय दिला असून कॉंग्रेसचे सर्व आरोप निराधार ठरले आहे असे भाजपने सांगितले आहे.

राजकीय दृष्ट्या हा राफेल मुद्दा अतिशय महत्त्वाचा होता. कॉंग्रेसने पाच राज्यातील निवडणुकीत राफेलचा मुद्दा अधिक उपस्थित केलेला होता. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून याच मुद्द्यावरून वारंवार सभागृहात गदारोळ सुरु होता. आजही याच मुद्द्यावरून गदारोळ सुरु आहे.

राहुल गांधींनी माफी मागावी 

राहुल गांधी यांनी राफेलवरून सरकारला लक्ष केले होते. सरकारवर निराधार आरोप करणारे राहुल गांधी यांनी देशवासीयांची माफी मागावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखील कॉंग्रेसवर आरोप केले आहे.