नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरण पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. भाजप सरकारमधील माजीमंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि प्रशांत भूषण यांनी राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. पुनर्विचार याचिकेत राफेल करारात केंद्राकडून चुकीची माहिती देण्यात आली आहे असे आरोप करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने यावर पुनर्विचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राफेल करारात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसून यात घोटाळा झालेला नसल्याचा निकाल दिला आहे.