राफेल मुख्यालयासमोर ‘राफेल’

0

नवी दिल्ली: कॉंग्रेसने मोदी सरकारला फक्त राफेलच्या मुद्द्यावरून लक्ष केले. प्रचारात देखील कॉंग्रेसने हा विषय अग्रस्थानी ठेवले. मोदींना वारंवार राफेलवर लक्ष केले जात असतांना आता पुन्हा नव्याने मोदी पंतप्रधान झाले आहे. दरम्यान दिल्लीतील काँग्रेस मुख्यलयासमोर राफेल विमानाची प्रतिकृती लावण्यात आली आहे.

दिल्लीतील २४ अकबर रोडवर काँग्रेस पक्षाचे मुख्यालय आहे. त्याला लागूनच वायुसेना प्रमुख बी.एस. धनोआ यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थाना बाहेरच राफेल विमानाची प्रतिकृती लावण्यात आली आहे. त्याला लागूनच काँग्रेस मुख्यलय असल्यामुळे ही प्रतिकृती काँग्रेस मुख्यालयासमोर लावली असा भास होतो. राफेलची येथील प्रतिकृती दिल्लीकरांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे. काही दिवसांपूर्वीच धनोआ यांनी राफेल विमानांचे कौतुक केले होते. तसेच राफेलची उत्सकता लागल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यात आता राफेल विमानाची प्रतिकृतीच धनोआ यांच्या घरासमोर लावण्यात आली आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये राफेल विमान भारतात दाखल होणार आहे.