रामकृष्णन गांधींची मरणोत्तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस

0

नवी दिल्ली । अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्शक दिवंगत रामकृष्णन गांधी आणि रिओ पॅराऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता टी मेरियाप्पन याचे प्रशिक्शक सत्यनारायण यांच्या नावाची शिफारस द्रोणाचार्य पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. गांधी यांनी गुरमीतसिंगला प्रशिक्शण दिले होते. गुरुमीतने गेल्यावर्षी जपानमधील नाओमी येथे झालेल्या आशियाई रेसवॉकिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय गांधी यांचा आणखी एक शिष्य असलेला बलजिंदरसिंग नाओमी येथे 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. गांधी यांनी जवळपास एक दशकभर भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन केले होते. गांधी यांचे वयाच्या 55 व्या वर्षी गेल्यावर्षी निधन झाले. कबड्डीचे प्रशिक्शक हीराचंद कटारिया हे या पुरस्कारसाठी शिफारस करण्यात आलेले तिसरे नाव आहे. साक्शी मलिकचे प्रशिक्शक कुलदीप मलीक आणि मनदीपसिंग यांच्या नावाची ही चर्चा करण्यात आली.