राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे शतक; रामगढ पोटनिवडणुकीत शाफिया जुबैर विजयी !

0

नवी दिल्ली – राजस्थानमधील रामगढ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार शाफिया जुबैर या विजयी झाल्या आहेत. १२२२८ मतांनी त्यांनी विजय मिळविला. पहिल्या फेरीपासून शाफिया जुबैर या मतमोजणीत आघाडीवर होत्या. शेवटपर्यंत त्यांची आघाडी कायम राहिली आणि अखेर त्यांनी विजय प्राप्त केला. २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत ही जागा भाजपने जिंकली होती.

आजच्या विजयाने राजस्थानमध्ये कॉंग्रेसच्या शंभर आमदार झाले आहे.

हरियाणातील जिंद आणि राजस्थानमधील रामगढ पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी आज गुरुवारी झाली. मतमोजणीच्या दहाव्या फेरीअखेर या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जुबैर यांना ९३२० मतांची आघाडी मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे सुखवंत सिंह पहिल्या फेरीपासून मागे होते. पहिल्या फेरीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला ९७७३ मते मिळाली तर भाजपच्या उमेदवाराला ७०९४ मते मिळाली. दुसरीकडे जिंदमध्ये जननायक जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत.