नवी दिल्ली: अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाची संबंधित 1994 च्या इस्माईल फारुकी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. मशिदीत नमाज पठण करणे इस्लामचा अविभाज्य घटक आहे की नाही हा मुद्दा मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं दोनास एक असा हा निकाल दिला. नमाज इस्लामचा अविभाज्य घटक आहे, हे प्रकरण आता मोठ्या खंडपीठाकडे जाणार नसल्यानं रामजन्मभूमी प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
29 ऑक्टोबरपासून अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनावणी होणार आहे. त्यामुळे देशाच्या इतिहासातल्या सर्वात मोठया जमीन वाटणीची केस लवकरच मार्गी निघणार आहे.