हडपसर । रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील प्रस्तावित कचरा प्रकल्पाला वाढता विरोध पाहता तीन वेळा आयोजन करूनही उद्धघाटन रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली आहे. नगरसेवक योगेश ससाणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे झालेल्या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांनीही पाठ फिरवल्याने महापौरांसह शहर भाजप तोंडघशी पडले आहेत.
उरुळी देवाची येथील कचरा डेपो येथील मर्यादा संपल्याने तेथील ग्रामस्थांनी आंदोलन केले आणि कचरा टाकणे बंद केले, आंदोलन मोठे लांबल्याने महापौर व शहर भाजप तोंडघशी पडले, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्याने ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले यावर लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना दिले. रामटेकडी औद्योगिक वसाहत येथील कचराप्रकल्प सुरू करण्याचा घाट भाजपने घातला मात्र नगरसेवक योगेश ससाणे यांनी तीव्र विरोध केला आणि मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा इशारा दिला, याचा परिणाम म्हणून भाजप ला तीन वेळा उद्धघाटन कार्यक्रम रद्द करावा लागला.
भाजप मनमानी विरोधात न्यायालयात जाणार
रामटेकडी येथील कचराप्रकल्प उद्धघाटन होणार कळले, महापौर मुक्ता टिळक यांना भेटलो होतो. मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर झोपणार असा इशारा दिला होता. त्यामुळे उद्धघाटन कार्यक्रम रद्द केले. हडपसरचे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. भाजप मनमानी करून कचराप्रकल्प करणार असेल, तर आम्ही याविरोधात न्यायालयात जाणार आहोत. प्रभागानुसार कचराप्रकल्प करावेत आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नय, याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील
– योगेश ससाणे, नगरसेवक, प्रभाग समिती अध्यक्ष