रीपाई पदाधिकार्यांना केली फटाक्यांची आतषबाजी ; मिठाईचेही वाटप
भुसावळ- रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटातर्फे रामदास आठवले यांची केंद्रीय मंत्री मंडळात राज्यमंत्री पदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर शहरातील तहसील कार्यालयाबाहेर ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, खा.प्र.अध्यक्ष लक्ष्मणराव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष विश्वासराव खरात, युवा नेते पप्पू सुरडकर यांनी फटाके फोडत मिठाई वाटप करून जल्लोष केला. प्रसंगी रीपाइंचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, विभागीय अध्यक्ष सुनील अंभोरे, छोटेलाल हरणे, बंडू देशमुख, भगवान निरभवणे, भीमराव वाघ, गोरखनाथ सुरवाडे, प्रकाश तायडे, रामदास ढिवरे, सुधीर दांडवेकर, प्रशांत झाल्टे आदी उपस्थित होते.