रामदास आठवलेंच्या ‘या’ कवितेवरुन राज्यसभेत गोंधळ

नवी दिल्ली : संसदेचं वरीष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार वाद झाल्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना राज्यसभेमध्ये बोलण्याची संधी देण्यात आली असता त्यांनी सादर केलेल्या कवितेमुळेही चांगलाच गदारोळ झाल्याचं पहायला मिळालं.

आठवलेंनी यमक जुळवून १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान एक कविता सादर केली. या नवीन घटनादुरुस्तीमुळे सर्व सामास वर्गातील जनतेला लाभ होणार असून पुन्हा २०२४ मध्ये मोदीच पंतप्रधान होती असं या कवितेच्या माध्यमातून आठवलेंनी मांडलं. मात्र या कवितेमध्ये त्यांनी पंगा या शब्दाला यमक जोडण्यासाठी वापरलेल्या शब्दावर विरोधी पक्षांना आक्षेप घेतला. तसेच हा शब्द रेकॉर्डमधून काढून टाकावा, ही संसदीय भाषा नाही असं म्हणत विरोधकांनी गोंधळ घातला. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे खासदार मात्र या कवितेवर मनसोक्त हसताना दिसले. मात्र नंतर हा शब्द रेकॉर्डवरुन हटवण्यात आल्याची माहिती पिठासीन अध्यक्षांनी दिली.

आठवलेंनी सादर केलेली कविता पुढीलप्रमाणे…

मेरा आज बहुतही आनंदी है मन
क्यो की पास हो रहा है १२७ वा संशोधन

अब खुश हो जाऐंगे एससी, बीसी और ओबीसी जन
वो आ गया है नजदीक क्षण

जो करती है काँग्रेस और विरोधी दलोपर वार
वो है मोदी सरकार
मोदीजी के लिये २०२४ मे खुल जाऐगा सत्ता का द्वार
मोदी हो जाऐंगी प्रधानमंत्री पद पर स्वार

काँग्रेस और विरोधी दलवाले रोज बोल रहे है हाय हाय
लेकिन नरेंद्र मोदी दे रहे है सबको सामाजिक न्याय
२०२४ मे जनता आपको करेगी बाय बाय
फिर हम काँग्रेस को करेंगे हाय हाय

अगर आप रोज करते रहोंगे हाऊस मे दंगा
तो एक दिन कर देंगे हम आपको नं*…
नरेंद्र मोदीजी से मत लो पंगा…