रामदास आठवलेंनी खासदार निधीतून पूरग्रस्तांना केली ५० लाखांची मदत !

0

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात कोल्हापूर, सांगलीमध्ये महापुराने थैमान घातले आहे. या पुरामुळे लाखो लोकांचे संसार डुबले. पूरग्रस्तांना पुन्हा संसार उभे करावे लागणार आहे. त्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. दरम्यान केंद्रीय सामाजिक आणि न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला खासदार निधीतून प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत जाहीर आहे. आज त्यांनी हैद्राबादमार्गे कोल्हापूरात येत पूरस्थितीची पाहणी केली.

कोल्हापूरमधील रांगोळी, कडोली, इंगळी, आंबेवाडी, जाधववाडी आणि कोल्हापूर शहर आदी भागांत आठवले यांनी पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. त्याचप्रमाणे सांगली जिल्हयातील ब्रह्मनाळ गाव आणि परिसरातील पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. स्वत:च्या खासदार निधीतून ५० लाखांची मदत करत आठवले यांनी राज्यातील अन्य आमदार, खासदारांनीही मदत देण्याचे आवाहन केले आहे.