सूरत । ‘दलित समाजावर अत्याचार होत असताना आमचे नेते राजकारण करण्यात मश्गूल आहेत’, असा आरोप करत एका दलित तरुणाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, यांच्या अंगावर काळा झेंडा फेकला. सूरतमध्ये हा प्रकार घडला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गटाचे नेते रामदास आठवले हे एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत.
देशात अनेक ठिकाणी दलित समाजावर अत्याचार सुरू आहे. त्याविरोधात आठवले काहीच बोलत नाहीत, असा आरोप करीत पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या एका दलित तरुणाने आठवलेंच्या खांद्यावर काळा झेंडा फेकून निषेध नोंदवला. रामदास आठवलेंच्या मागे उभ्या असलेल्या तरुणाने अचानक काळा झेंडा फेकल्याने क्षणभर कोणाला काहीच समजले नाही. हा सर्व प्रकार पत्रकार परिषद सुरू असताना घडला. या घटननेनंतर या तरुणाला बाहेर काढण्यात आले.