रामदास आठवले यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत दिली प्रतिक्रिया !

0

मुंबई-केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर काल हल्ला झाला होता. दरम्यान या हल्ल्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळे नाराज असलेल्या लोकांकडून हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शक्यता त्यांनी व्यक्त केलीय. पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न ठेवल्याने हा प्रकार घडल्याचा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात आठवले हे मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहेत. कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले आहे. तरूणाची ओळख पटली असून प्रवीण गोसावी असे त्याचे नाव आहे.

रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्यावर काल अंबरनाथमध्ये हल्ला करण्यात आला. व्यासपीठावरुन उतरत असताना एका तरुणाने रामदास आठवले यांच्या कानशिलात लगावली. रिपाईच्या कार्यकर्त्यानी या तरुणाला पाहताच पकडले आणि बेदम चोप दिला. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अंबरनाथ पश्चिममध्ये विको नाका परिसरात नेताजी मैदानात संविधान दिनानिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रामदास आठवले आले होते.