जळगाव । रामदेववाडी येथील यात्रेत महिला व मुलींची काही तरूणांनाकडून छेड काढण्यात येत होती. ही गोष्ट पोलिस कर्मचार्यास हटकल्यानंतर त्यांनी कारवाई करण्यास सुरूवात केली. पंरतू, छेड काढणार्या तरूणांच्या टोळीने पोलिस कर्मचार्यालाच धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण झाला. या धक्काबुक्कीत पोलिस कर्मचार्यास मुक्कामार लागला आहे. दरम्यान, धक्काबुक्की करणार्या तरूणांच्या टोळीविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्काबुक्कीत पोलिस कर्मचार्यास किरकोळ दुखापत
एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेमणुक असलेले शशिकांत सुरेश पाटील हे तालुक्यातील रामदेववाडी येथे सुरू असलेल्या जत्रेनिमित्त तेथे बंदोबस्तासाठी तैनात होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास जत्रेतील महिलांची व तरूणींची काही टवाळखोरांकडून छेड काढण्यात येत असल्याचा प्रकार सुरेश पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी तरूणांच्या टोळीवर पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरूवात केली. परंतू, टवाळखोर तरूणांनी शासकीय कामात अडथळा घालत पोलिस कर्मचारी सुरेश पाटील यांच्यासह घटनेचे साक्षीदार यांना धक्काबुक्की केली. यात पाटील यांना मुक्कामार लागला. यानंतर आज बुधवारी बंदोबस्त संपल्यानंतर सुरेश पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भास्कर देविदास जाधव, देविदास उखा राठोड, जोतमल उखा राठोड, अरूण भाईदास चव्हाण, देविदास सरीचंद राठोड, धनराज के राठोड, राजू बुधा, योगेश यांच्यासह दोन ते तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक योगेश शिंदे हे करीत आहेत.
बालकाची आत्महत्या
जळगाव । रामानंदनगर परिसरातील जागृती हौसिंग सोसायटी येथे राहणार्या 17 वर्षीय बालकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री 7.50 वाजता ही घटना घडली. गौरव प्रकाश सोनवणे असे मृत बालकाचे नाव आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गौरव सोनवणे या युवकाने मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केली. ही घटना कुटूबियांच्या लक्षात येताच त्यांनी गौरव यास खाली उतरवून त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले. यावेळी कुटूंबियांसह नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात एकच आक्रोश केला. तसेच शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.