रामदेव बाबा आता खासगी सुरक्षा रक्षकांची निर्मिती करणार

0

नवी दिल्ली – पतंजली संस्थेचे संस्थापक रामदेव बाबा यांनी हरिद्वारमध्ये ङ्गपराक्रम सुरक्षा प्राइव्हेट लिमिटेड3 या नावाने खासगी सुरक्षा कंपनीचा शुभारंभ केला आहे.

योग स्वास्थानंतर विविध दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या बाजारपेठेत पतंजलीला अव्वल स्थानावर नेऊन पोहोचल्यानंतर रामदेव बाबा यांनी कोट्यवधी रुपये या नव्या कंपनीमध्ये गुंतवले आहेत. ही कंपनी देशातील हजारो युवकांना खासगी सुरक्षा रक्षक होण्यासाठी प्रशिक्षण आाणि नौकरीदेखील देणार आहे. आज देशात खासगी सुरक्षा रक्षकांचा व्यवसाय 40 हजार कोटी रुपयांचा आहे. बाबा रामदेव यांच्या या खासगी सुरक्षा रक्षकांच्या कंपनीमध्ये पोलीस आणि संरक्षण दलातील निवृत्त अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत. कंपनीच्या उद्घाटन प्रसंगी बाबा रामदेव यांनी पराक्रम सुरक्षा, आपकी रक्षा, असा घोष दिला आहे. ही कंपनी देशभरात जनसामान्यांमध्ये सैनिकी भावना जागृत करील. योगगुरु रामदेव बाबा पुढे म्हणाले की, पतंजलीच्या प्रयत्नाने योग, आयुर्वेद आणि स्वदेशी अभियान या माध्यमातून देशात आरोग्य स्वाथ्याबरोबर राष्ट्राभिमान जागृत करण्यात येणार आहे. पराक्रम सुरक्षा एजंन्सी ही देशातील प्रत्येक नागरिकामध्ये स्वसंरक्षण तसेच देशाभिमान जागृत करेल.

पहिल्या बॅचमध्ये 100 कर्मचार्‍यांना मागील एक महिन्यापासून प्रशिक्षण देणे सुरू आहे. या वर्षीच्या शेवटाला या कंपनीच्या देशभरात शाखा सुरू झालेल्या असतील. देशातील भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (फिक्की) च्या अहवालानुसार देशात खासगी सुरक्षा एजंन्सी या क्षेत्राचा कारभार 40 हजार कोटी रुपयांचा आहे. मागील काही वर्षांपासून या क्षेत्रात आलेली तेजी पाहता 2020 पर्यंत या क्षेत्रातील उलाढाल 80 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. रामदेव बाबा यांनी 2006 साली पतंजलीची स्थापना केली होती. योगानंतर रामदेव बाबा यांनी दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या बाजारपेठेत पाऊल टाकले, तेव्हापासून कंपनीची उलाढाल वाढत जाऊन ती आज 10 हजार 561 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.