रामनगरात सेट्रींग साहित्य ठेवलेल्या खोलीला आग

0

जळगाव। शहरातील राम नगरात सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सेट्रींगचे साहित्य ठवलेल्या खोलीला अचानक आग लागली. आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. यानंतर अग्निशमन बंब घटनास्थळी आल्यानंतर काही मिनीटातच आग विझविण्यात यश आले. मात्र, आगीत सेट्रींगचे साहित्य जळून खाक झाले होते.

डिमार्ट मॉल परिसरातील राम नगरात इकबाल इसाक खाटील हे कुटूंबियांसोबत राहतात. दरम्यान. इकबाल यांनी त्यांच्या राहत्या घराचे बांधकाम दुरूस्तीचे काम काही दिवसांपासून सुरू केले होते. त्यामुळे घरासमोरच सेट्रींग साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी एक पत्र्याची खोली बनविली होती. त्यामुळे काम संपल्यानंतर त्यात सेट्रींग साहित्य ठेवले जायचे.

नागरिकांची आग विझविण्यासाठी धावपळ
शनिवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मात्र, खोलीला अचानक आग लागली. परिसरातील नागरिकांनी तसेच इकबाल शेख यांना खोलीला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांन अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिल्यानंतर काही मिनिटाच महानगरपालिकेची अग्निशमन गाडी घटनास्थळी आली. अग्निमशन कर्मचार्‍यांनी लागलीच पाण्याचा मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात सर्वत्र धुराळा झाला होता. यानंतर कर्मचार्‍यांना आग विझविण्यात यश आले. या आगीत मात्र, सेट्रींग साहित्य जळून खाक झाले होते. इकबाल खाटील यांनी यानंतर नागरिकांच्या मदतीने जळालेली खोली पाडून पुन्हा पाण्याचा मारा केला. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.